नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने नशिराबाद येथील सार्वजनिक वाचनालयात नव्याने खरेदी करण्यात आलेल्या ग्रंथांचे आकर्षक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन नशिराबाद नगरपरिषदेचे स्थायी समितीचे अध्यक्ष मनोज चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ग्रंथपूजन करून करण्यात आले.या प्रसंगी वाचनालयाचे कार्याध्यक्ष जनार्दन शामराव माळी, सचिव अॅड. प्रदीप मुरारी देशपांडे यांच्यासह संचालक मंडळातील मिठाराम शामराव म्हसकर, राजेश्वर सखाराम धर्माधिकारी, जितेंद्र देविदास पाटील, मनोज अरुण नाईक, बंडू रूपचंद खंडारे उपस्थित होते. तसेच ग्रंथपाल अनुराधा पंकज तारकस, शिपाई सुधाकर बाबुराव महाजन यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सहभाग नोंदविला.
यावेळी प्रा. व्ही. बी. कोष्टी, दगडू दत्तात्रय माळी, अशोक महादेव धोत्रे, सुनील सुकलाल शिवरामे, विजय कृष्णाजी तिडके यांच्यासह अनेक वाचक व सभासद उपस्थित होते. नव्या ग्रंथांच्या प्रदर्शनामुळे वाचन संस्कृतीला चालना मिळेल, असा आशावाद उपस्थितांनी व्यक्त केला.

