जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक विद्यालय व डॉ.सुनिलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेज, मेहरुण येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 निमित्त पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर जयश्रीताई महाजन उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी नवीन शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देत पालकांना मार्गदर्शन केले.सभेत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर व सायन्स (इंग्रजी माध्यम) हे दोन नवीन विषय सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
वर्गशिक्षक ज्ञानचंद बऱ्हाटे, संदीप खंडारे, केतन बऱ्हाटे व सौ.सीमा ताडे यांनी वर्गनिहाय पालकांना विद्यार्थ्यांच्या अध्ययन पद्धती, शिस्त व अभ्यासक्रमाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पालकांचे आभार मानण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन तसेच सर्वांचे सहकार्य लाभल्याचे आयोजकांनी सांगितले.

