Sunday, June 21, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याआंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; न्यू इंग्लिश स्कूल 1990-91 च्या माजी विद्यार्थ्यांचा...

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; न्यू इंग्लिश स्कूल 1990-91 च्या माजी विद्यार्थ्यांचा सहभाग

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूलच्या सन 1990-91 च्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत उत्साहपूर्ण वातावरणात योग दिन साजरा केला. नशिराबाद येथील स्वामी समर्थ केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात माजी विद्यार्थ्यांनी विविध योगासने सादर करत आरोग्याबाबत जनजागृती केली.योग ही भारतीय संस्कृतीची प्राचीन आणि अमूल्य परंपरा असून शरीर, मन व आत्म्याचा समतोल राखण्यासाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती टिकून राहते, मानसिक शांतता लाभते तसेच एकाग्रता वाढण्यास मदत होते. तणावमुक्त आणि निरोगी जीवनासाठी योग आवश्यक असल्याचा संदेशही उपस्थितांना देण्यात आला.कार्यक्रमात सहभागी मित्रांनी भुजंगासन, सुखासन, वृक्षासन, ताडासन, नौकासन, त्रिकोणासन, बालासन, शीर्षासन व चक्रासन आदी विविध योगमुद्रा सादर केल्या. योगासनांचे मार्गदर्शन विजय गायकवाड यांनी केले.यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी पन्नाशी ओलांडल्यानंतरही नियमित योगाभ्यास केल्यास आरोग्य चांगले राहण्यास मोठी मदत होते, असे सांगितले.
कार्यक्रमास सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते. योग सत्रानंतर चहा व अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या