Sunday, August 2, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणलोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वक्तृत्व...

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा उत्साहात!

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रवीण महाजन हे होते. यावेळी मंगला पिंगळे व वंदना चौधरी उपस्थित होत्या. प्रारंभी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी टिळक यांच्या जीवनकार्य, राष्ट्रसेवा व स्वातंत्र्यलढ्यातील योगदान यावर प्रभावी मनोगते व्यक्त केली. तसेच अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्य, समाजकार्य व जनजागृतीतील योगदानाचा गौरव करण्यात आला.यावेळी वंदना चौधरी यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा आढावा घेतला, तर वैशाली पाचपांडे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या समाजप्रबोधनात्मक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.वक्तृत्व स्पर्धेतील लहान गटात इयत्ता पहिलीतील उपासना किरण पाटील व इयत्ता दुसरीतील तन्वी राकेश बार्हे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मोठ्या गटात इयत्ता तिसरीतील ईशा विक्रम चौधरी, तसेच इयत्ता चौथीतील हर्षिता सचिन घोडकर आणि गितेश आनंदा चव्हाण यांनी उत्कृष्ट वक्तृत्व सादर करून प्रथम क्रमांक मिळविला.

कार्यक्रमाचे नियोजन वंदना चौधरी, पूजा पाटील, आशा इसाने आणि जयश्री चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या