Saturday, September 5, 2026
police dakshta logo
Homeजळगावशिक्षकांच्या भूमिकेत रमले विद्यार्थी; संस्कृती विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

शिक्षकांच्या भूमिकेत रमले विद्यार्थी; संस्कृती विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

अध्यापनाचा प्रत्यक्ष अनुभव घेत विद्यार्थ्यांनी व्यक्त केला शिक्षकांप्रती आदर

मेहरूण : संस्कृती माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.शिक्षक दिनानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे शिक्षकांची भूमिका साकारत विविध विषयांचे अध्यापन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या वेशभूषेत वर्गावर जाऊन विद्यार्थ्यांसमोर अध्यापनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. शिक्षक म्हणून वर्गासमोर उभे राहून शिकविताना विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, वक्तृत्वकौशल्य तसेच नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत झाली.या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षकांचे कार्य, त्यांच्यावर असलेली जबाबदारी तसेच विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षक घेत असलेल्या मेहनतीची प्रत्यक्ष जाणीव झाली. शिक्षकांची भूमिका साकारण्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी आनंदाने घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आदर व कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात शिक्षक दिनाचा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या