Tuesday, June 9, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याना.संजयभाऊ सावकारे यांच्या प्रयत्नाने वाघुर धरणाच्या उजव्या कालव्यातून आवर्तन सुटले !

ना.संजयभाऊ सावकारे यांच्या प्रयत्नाने वाघुर धरणाच्या उजव्या कालव्यातून आवर्तन सुटले !

भुसावळ | जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :- वाघुर धरणाच्या उजव्या कालव्यातून आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली होती.या बाबत सतत बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या तसेच ना.संजयभाऊ सावकारे यांच्या धरण प्रशासनाशी सतत संपर्क केल्याच्या प्रयत्नाने या सर्वांची दखल घेत अखेर वाघुर धरणाच्या प्रशासनाने दि.८ जून रोजी दुपारी धरणाच्या उजव्या कालव्यातून ३० क्युसेस पाणी पुरवठा आवर्तन सोडण्यात आले आहे. उजव्या कालव्याचे काम सुरू असल्याचे कारण देत शेतकऱ्यांनी मागणी करुनही रब्बी हंगामात आवर्तन सोडण्यात आले नाही तसेच खरीप हंगामातील कपाशी लागवड करण्यासाठी मे महिन्यात आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी केली जात होती मात्र वर्तमानपत्रातून सतत बातम्या प्रसिद्ध झाल्या तसेच काही गावातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी वाघुर धरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.तसेच ना.संजयभाऊ सावकारे यांनी ही धरणाच्या प्रशासन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी सुध्दा शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. आ.एकनाथराव खडसे यांनी सुध्दा विधीमंडळात पाणी सोडण्याची मागणी केलेली होती.अशा सर्वांची दखल घेत की काय ? वाघुर धरणाच्या अधिकाऱ्यांनी उजव्या कालव्यातून आवर्तन सोडल्याने शेतकरी समाधानी झाला असून खरीप हंगामासाठी शेती तयार करताना दिसत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या