Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावजळगावच्या पोलनपेठेतील अपघातात एक गंभीर

जळगावच्या पोलनपेठेतील अपघातात एक गंभीर

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या पोलन पेठेतील मुख्य रस्त्यावर मराठा मटण हॉटेलजवळ एका चहाच्या दुकानदाराला मागून धडक देत गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी दुचाकीचालकाविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल कैलास राजपूत (वय ३५, रा. बालाजी पेठ, जळगाव) हा पोलन पेठेत चहाविक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतो. गजबजलेल्या वेळी तो चहा बनवत असताना अचानकपणे एक दुचाकीस्वार एक दुचाकीस्वार क्र. (एमएच १९ डीएफ ३७८७) ने जोरात आला. अन विशाल राजपूत यास मागून जोरदार धडक देऊन गंभीर जखमी केले. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले. तर धडक देणाऱ्या दुचाकीस्वार तरुणाला जमाव चोप देण्याच्या प्रयत्नात असताना तो पळून गेला. दरम्यान शुद्धीवर येऊन प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याने शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना जबाब दिला आहे. त्याच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र सोनार करीत आहेत. दरम्यान, सदर दुचाकी पाचोरा येथील आहे. त्या व्यक्तीचा मुलगा अहमदाबाद येथे राहतो. तर घटनेतील दुचाकी जळगावात नेमकी कुणाला दिली होती, याचा तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या