जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात रुग्णसेवेत अहोरात्र कार्यरत असलेल्या डॉक्टरांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी डी. एन. ठाकूर तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.“अहोरात्र रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान होणे ही समाजाची जबाबदारी आहे,” अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. कार्यक्रमात डॉक्टरांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक करण्यात आले.या प्रसंगी आरोग्य संजू अहिरे, पप्पू जगताप, कु. किरण कापडणे, वेदांत एज्युकेशनच्या संचालिका हर्षाली ढाके तसेच जन्मत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले आदी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
डॉक्टर्स डे निमित्त सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा सत्कार
RELATED ARTICLES

