Wednesday, June 10, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याग्रामीण शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; मंगेश निळे सरांना राज्यस्तरीय आदर्श संस्थाचालक...

ग्रामीण शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; मंगेश निळे सरांना राज्यस्तरीय आदर्श संस्थाचालक पुरस्कार

मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शिक्षण क्षेत्रात गेल्या 13 वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने योगदान देणारे श्री. मंगेश निळे यांना राज्यस्तरीय आदर्श संस्थाचालक पुरस्कार 2026 प्रदान करून गौरविण्यात आले.शिर्डी येथे दिनांक 7 जून रोजी आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात मराठी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री Nivedita Pagar यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार Be The Change Foundation यांच्या वतीने Shri Sai Palkhi Nivara येथे कुटुंबियांच्या उपस्थितीत देण्यात आला.

श्री. मंगेश निळे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा व स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची Indian Space Research Organisation सारख्या प्रतिष्ठित संस्थांना शैक्षणिक भेटीसाठी निवड झाली आहे.तसेच मुक्ताईनगर व परिसरातील विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्राची गोडी लागावी यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले असून, मागील वर्षी व यावर्षी मिळून चार विद्यार्थ्यांची बाल वैज्ञानिक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांच्या या शैक्षणिक, सामाजिक व विद्यार्थीहिताच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय आदर्श संस्थाचालक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, पालक, विद्यार्थी तसेच मित्रपरिवाराकडून श्री. मंगेश निळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. हा पुरस्कार मुक्ताईनगर परिसरासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या