मान्यवरांकडून विद्यार्थांना करिअर मार्गदर्शन
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जनमत प्रतिष्ठान आणि वेदांत एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या 26 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्याबरोबरच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी माजी महापौर तथा नगरसेविका आणि राज विद्यालयाच्या संचालिका सौ. जयश्री महाजन, विधीतज्ञ ॲड. निखिल पाटील, संदीप युनिव्हर्सिटीचे निलेश बनसोडे, ऑगस्टीन क्लासेसचे प्रजापती सर, मनसे जिल्हाध्यक्ष मुकुंद रोटे, राहुल पाटील, जिल्हा परिषद सदस्या मनीषा पाटील, रसायनशास्त्र विषयतज्ज्ञ दिलीप भारंबे, प्रल्हाद भारंबे, दुर्वास महाजन, भागवत कुरकुरे, विजय सोनवणे, शक्ती महाजन तसेच सौ. माधुरी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले आणि वेदांत एज्युकेशनच्या संचालिका हर्षाली ढाके यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय वानखेडे सर आणि सौ. ज्योतीराणी मॅडम यांनी केले.दरवर्षी अशाच पद्धतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा संकल्प जनमत प्रतिष्ठान व वेदांत एज्युकेशनतर्फे व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

