Sunday, June 14, 2026
police dakshta logo
Homeआरोग्यमोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे नाशिराबाद येथे आयोजन

मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे नाशिराबाद येथे आयोजन

GPS मित्र परिवार व आर.आर. झुंझुणवाला शंकरा आय हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने उद्या नेत्रतपासणी शिबिर

नाशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- GPS मित्र परिवार तसेच आर.आर. झुंझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिराबाद येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सोमवार, दि. १५ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेदरम्यान आयोजित करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये मोतीबिंदूची तपासणी, चष्म्याची तपासणी तसेच चष्म्याचा नंबर काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. फिरत्या नेत्रालयाच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात येणार आहे.
नाशिराबाद, वेळी, निमगाव, भादली जळगाव खुर्द, कडगाव, मन्यारखेडे, तरसोद तसेच परिसरातील नागरिकांसाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे शिबिर शिवसेना कार्यालय, श्री विठ्ठल मंदिरासमोर, खालची आळी, नाशिराबाद येथे आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ७५१७५ ०९०९० व ९८९०५ ९८१९९ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.मोतीबिंदूसह विविध नेत्रविकारांचे वेळेत निदान व उपचार व्हावेत, तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या