नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त नशिराबाद येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हा उपक्रम उत्साहात पार पडला.राज ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना मुंबईत येऊन शुभेच्छा देण्याऐवजी आपल्या गावात वृक्षारोपण करून निसर्गसौंदर्य वृद्धिंगत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या संदेशाला प्रतिसाद देत नशिराबाद येथे मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विनायक धर्माधिकारी, विवेक नाईक, नशिराबाद मनसे शहराध्यक्ष जितेंद्र बराटे, सुभाष पवार, दिलीप मिस्त्री, शुभम भावसार, विशाल पाटील, पियुष जोशी, गणेश कुंभार, गोपाल भारुडे, राकेश बिऱ्हाडे, रितेश बराटे, संतोष कुंभार यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला असून परिसरात हरित वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम स्तुत्य ठरला.

