नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येथील तालुका ‘ब’ दर्जाचे तसेच ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या सार्वजनिक वाचनालय नशिराबाद संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद आमोदकर होते.व्यासपीठावर कार्याध्यक्ष जनार्दन शामराव माळी तसेच सचिव ॲड. प्रदीप देशपांडे उपस्थित होते.सभेच्या प्रारंभी उपस्थित सभासद व वाचकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. प्रमोद आमोदकर यांनी प्रास्ताविकातून सभेचा उद्देश स्पष्ट करत संस्थेच्या कार्याचा संक्षिप्त आढावा मांडला. त्यानंतर शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील दिवंगत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सभेमध्ये मागील आर्थिक वर्षातील जमा-खर्च पत्रक, आगामी वर्षाचे अंदाजपत्रक तसेच विविध खर्चास मान्यता देण्याबाबतचे विषय मांडण्यात आले. संस्थेने वर्षभरात केलेल्या विविध उपक्रमांचा व प्रगतीचा अहवाल कार्याध्यक्ष जनार्दन माळी यांनी सादर केला. तसेच वाचनालयासाठी नवीन पुस्तके, मासिके व पाक्षिके उपलब्ध करून देण्यासंदर्भात वाचकांकडून सूचना मागविण्यात आल्या.सभेदरम्यान वाचकांनी मांडलेल्या विविध समस्या व अडचणींवर चर्चा करून त्याबाबत आवश्यक निराकरण करण्यात आले. तसेच लेखापरीक्षकांच्या निवडीसंदर्भातील विषयालाही मान्यता देण्यात आली.
सभेचे सूत्रसंचालन प्रा. व्ही. बी. कोष्टी यांनी केले. शेवटी डॉ. प्रमोद आमोदकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. अल्पोपहारानंतर सभेची सांगता करण्यात आली. यावेळी वाचनालयाचे पदाधिकारी, सभासद व मोठ्या संख्येने वाचक उपस्थित होते.