Monday, May 4, 2026
police dakshta logo
Homeअपघातबेलसवाडी फाट्यावर भीषण धडक; दांपत्याचा जागीच मृत्यू, बालक थोडक्यात बचावले

बेलसवाडी फाट्यावर भीषण धडक; दांपत्याचा जागीच मृत्यू, बालक थोडक्यात बचावले

मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी फाटा परिसरात सोमवारी सकाळी सुमारे आठच्या सुमारास एक अत्यंत गंभीर अपघात घडला.मरिमाता मंदिराजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.या दुर्घटनेत गजानन हिरामण पाटील आणि त्यांची पत्नी अश्विनी गजानन पाटील (रा. कोचूर, ता. रावेर) यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संबंधित दांपत्य आपल्या सुमारे एक वर्षाच्या चिमुकल्यासह दर्शनासाठी जात असताना हा अपघात घडल्याचे समजते.अपघाताची तीव्रता मोठी असतानाही सोबत असलेले लहान मूल सुदैवाने बचावले, ही बाब दिलासा देणारी ठरली आहे. घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य हाती घेतले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करण्यास सुरुवात केली असून नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या