नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद पंचक्रोशीतील इयत्ता १० वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी स्वयंशोध फाउंडेशन, नशिराबाद यांच्या वतीने भव्य ‘गुणगौरव समारंभ २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून परिसरातील पालक, विद्यार्थी व नागरिकांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा या समारंभात सन्मान करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांना जळगाव येथील व्हिजन अकॅडमीतर्फे ११ वीच्या प्रवेश शुल्कामध्ये विशेष सवलत देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
हा गुणगौरव सोहळा रविवार, दि. ३१ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता रामपेठ येथील सार्वजनिक वाचनालयाजवळ, नशिराबाद येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हिजन अकॅडमी, जळगावचे संचालक अनिल माला सर हे राहणार आहेत. तर प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी युवती काँग्रेस अजित पवार पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्ष कु. भाग्यश्री विवेक ठाकरे, प्रा. ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलच्या सौ. वृषाली महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. कल्पिता पाटील उपस्थित राहणार आहेत.यावेळी नशिराबाद नगरपंचायतीचे नगराध्यक्ष योगेश पाटील, उपनगराध्यक्ष पंकजभाऊ महाजन, नगरसेवक चेतनभाऊ बऱ्हाटे, शिव छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेशभाऊ चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सत्यम रामजीत सिंह, जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुंकुदभाऊ रोटे तसेच एन.के. बिल्डकॉनचे जियाउल इस्लाम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.स्वयंशोध फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे गुणवंत विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला योग्य व्यासपीठ मिळणार असून त्यांच्या आत्मविश्वासात भर पडणार आहे. त्यामुळे नशिराबाद व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संपर्क:
धीरज सैतवाल (सचिव) – ९०२११११४६२
योगेश कोलते (अध्यक्ष) – ८३८१०४९७०१

