Tuesday, June 2, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याना.संजयभाऊ सावकारे यांच्या प्रयत्नाने भुसावळ - बेलव्हाळ एसटी सुरू !

ना.संजयभाऊ सावकारे यांच्या प्रयत्नाने भुसावळ – बेलव्हाळ एसटी सुरू !

भुसावळ |  जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव बेलव्हाळ एसटी बस सेवा बंद करण्यात आली होती मात्र सुनसगाव व बेलव्हाळ येथील सरपंच यांच्या कडे ग्रामस्थांनी एसटी सुरू करण्यासाठी तगादा लावला होता. त्यामुळे बेलव्हाळ येथील सरपंच पती जितेंद्र खाचणे व सुनसगाव येथील सरपंच पती भोजराज कोळी यांनी भुसावळ एसटी डेपो व्यवस्थापक राकेश शिवदे साहेब यांना निवेदन दिले होते.त्याच प्रमाणे या बाबत ना.संजयभाऊ सावकारे यांच्या कडे एसटी सुरू करण्यासाठी मागणी करण्यात आली होती.या मागणीची दखल घेत एसटी डेपो व्यवस्थापक राकेश शिवदे साहेब यांनी भुसावळ बेलव्हाळ एसटी सेवा सुरू करुन ग्रामीण व गरजू गरीब जनतेसाठी सेवा दिली आहे. ना.संजयभाऊ सावकारे यांच्याशी पत्रकार जितेंद्र काटे यांनी संपर्क साधून एसटी सेवा सुरू करण्याची मागणी केली होती.

आज रोजी भुसावळ येथून सकाळी ९ वाजता तर दुपारी ३ वाजता अशी दोन वेळा एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे या परिसरातील नागरिक एसटी सेवा सुरू झाल्याने फायदा घेतांना दिसत आहेत. आता लवकरच वांजोळा ,गोंभी,सुनसगाव मार्गे बेलव्हाळ एसटी सुरू करण्यात येणार असल्याचे समजते त्यासाठी भुसावळ एसटी डेपो चे व्यवस्थापक यांनी या मार्गाची पाहणी केली आहे.सुनसगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून निवेदन दिल्यानंतर लगेच १५ जून च्या अगोदर गोंभी मार्गे एसटी सुरू होणार असल्याची खात्रीलायक माहिती असून ना.संजयभाऊ सावकारे यांनी यासाठी प्रयत्न केल्याचे समजते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या