३ मे रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजन; BNS, BNSS, BSA बाबत सविस्तर मार्गदर्शन
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पत्रकारांसाठी नवीन फौजदारी कायद्यांवर विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) आणि भारतीय पुरावा अधिनियम (BSA) या नव्या कायद्यांबाबत सखोल माहिती देण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.
ही कार्यशाळा रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० या वेळेत पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव येथील प्रेरणा हॉलमध्ये होणार आहे. या कार्यशाळेत नव्या कायद्यांची अंमलबजावणी, त्यातील महत्त्वपूर्ण बदल तसेच पत्रकारांना आवश्यक असलेले मार्गदर्शन यावर तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधू-भगिनींनी या मार्गदर्शन कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आले आहे. कार्यशाळेनंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

