PMJAY, HPV लसीकरण, टीबी निर्मूलन आणि ‘माझा गाव, आरोग्य संपन्न गाव’ उपक्रमांवर दिले मार्गदर्शन
नशिराबाद | प्रतिनिधी |पोलीस दक्षता लाईव्ह :- दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी जिल्हा परिषदच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करिष्मा नायर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) नशिराबाद येथे भेट देऊन विविध आरोग्य योजनांचा सविस्तर आढावा घेतला.भेटीदरम्यान त्यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत क्लेम्स, एचपीव्ही (HPV) लसीकरण, ‘100 डेज टीबी’ मोहिम, पॅलिएटिव्ह केअर सेवा तसेच ओपीडी व आयपीडी विभागाच्या कामकाजाची पाहणी केली. याशिवाय ‘माझा गाव, आरोग्य संपन्न गाव’ या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबतही त्यांनी माहिती घेतली.

यावेळी सर्व बाबींचा सखोल आढावा घेत मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी आरोग्य सेवा अधिक प्रभावी व गुणवत्तापूर्ण करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

